पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अत्याचारात अल्पवयीन मुलीवर अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरु आहे. कोलकाता सारखी घटना या ठिकाणी घडली असून या घटनेने जोधपूर हादरले आहे. रुग्णालयांना सुरक्षित समजले जाते त्या ठिकाणी अशा घटना घडणे समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे.