वास्तविक हा स्फोट एका पार्सलमधून करण्यात आला होता. साबरमती परिसरातील शिवम प्लाझाजवळ राहणाऱ्या एका कुटुंबाला पार्सल मिळाले. पार्सल उघडताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.