MP Jaya Bachchan News: समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी शुक्रवारी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भाजप खासदारांवर आरोप केला आहे. ते नाटक करताय, त्यांना अभिनयाचा पुरस्कार द्यायला हवा, असे त्या म्हणाल्या. राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी दावा केला की, अभिनेत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भाजप खासदारांसोबत काम केले आहे.