भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 8 लोकांचा मृत्यू

गुरूवार, 13 जून 2024 (12:15 IST)
हायवे अपघात : उत्तर प्रदेशमध्ये हायवे अपघातात एकाच कुटुंबातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

उत्तर प्रदेशमधील हरदोई हायवेवर रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीवर अनियंत्रित ट्रक पालटला. तर या ट्रक खाली दाबल्यागेल्यामुळे एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कानपूर कडून येणारा ट्रक हरदोई ला जात होता. मल्लावा कसबे मध्ये मोहिउद्दीनपुर चुंगी नंबर दोन जवळ ट्रक पोहचालच होता तेवढ्यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. व ट्रक हायवेला लागून असलेल्या झोपडीवर जाऊन पालटला. या झोपडीत एकाच कुटुंबातील आठ सदस्य होते. ज्यांच्या या ट्रकच्या खाली दाबल्यागेल्यामुळे मृत्यू झाला. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. व हाइड्रा व क्रेन च्या मदतीने ट्रक उचलण्यात आला. व खाली दाबल्या गेलेल्या लोकांना अँब्युलन्स च्या मद्वयीने रुग्णालयात पाठवण्यात आले पण चिकिस्तकांनी या आठ लोकांना मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रक चालकला ताब्यात घेतले असून पुढी चौकशी सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती