सातच मिनिटांच्या शपथविधीचा ४२ लाख खर्च

शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (11:16 IST)
कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा शपथविधी २३ मे रोजी अवघ्या सातच मिनिटांत पार पडला होता. मात्र ४२ बडय़ा नेत्यांच्या पाहुणचारासाठी राज्य सरकारला ४२ लाखांचा भुर्दंड बसला आहे. त्या नेत्यांपैकी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (८ लाख ७२ हजार ४८५ रुपये) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (१ लाख ८५ हजार) यांच्यावर सर्वाधिक खर्च झाला.
 
– केजरीवाल यांचे खानपान ७१ हजारांचे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगळुरूतील मुक्काम ‘ताज वेस्ट एंड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. त्यांनी २३ मे रोजी सकाळी ९.४९ वाजता ‘चेक इन’ केले होते. तर २४ मे रोजी सकाळी ५.३४ वाजता ‘चेक आऊट’ केले हेते. पण मुक्काम केल्याच्या एका रात्रीतील केजरीवाल यांचा खानपानावरील खर्च ७१ हजार २५ रुपये झाले.
 
नेत्यांवरील खर्च
मायावती (बसपा नेत्या) -१ लाख ४१ हजार ४४३
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) – ६४ हजार
अखिलेश यादव (समाजवादी पार्टी) – १ लाख २ हजार ४००
पिनाराई विजयन (मुख्यमंत्री केरळ) – १ लाख २ हजार ४००
बाबूलाल मरांडी (माजी मुख्यमंत्री झारखंड) – ४५ हजार ९५२
कमल हसन (अभिनेते) – १ लाख २ हजार ४०.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती