पिलीभीत- सध्या उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये विषाणूजन्य तापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. शहरालगतच्या नौगाव पाकिया परिसरात गेल्या 20 दिवसांत गूढ तापाने 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभाग आणि नगर पंचायतीवर गंभीर आरोप केले आहेत.