पिलीभीतमध्ये मोठा अपघात : गंगेत स्नान करून घरी परताना 10 जणांचा मृत्यू

गुरूवार, 23 जून 2022 (11:23 IST)
हरिद्वारहून लखीमपूर खेरीला जाणारा DCM पिलीभीतमध्ये अचानक उलटला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 जण जखमी असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन जखमींवर बरेली आणि इतरांवर पिलीभीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पीलीभीत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरीतील गोला कोतवाली परिसरातील तीरथ परिसरात राहणारे हे कुटुंब मुलीच्या लग्नानंतर गंगेत स्नान करून घरी परतत होते. शाहजहांपूर जिल्ह्यातील पुवन्या कोतवाली भागातील अखौना खुर्द गावातील नातेवाईकांसह हे कुटुंब गंगास्नानासाठी गेले होते. पिलीभीतहून गोलाकडे जाणारा त्यांचा डीसीएम अचानक अनियंत्रित झाला आणि महामार्गावरून खाली उतरून झाडात घुसला.
 
ड्रायव्हरला डुलकी लागली आणि डीसीएम अचानकपणे अनियंत्रितपणे उलटल्याचं समजतं. पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. DCM मध्ये एकूण 17 लोक होते. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तीन जखमींना डॉक्टरांनी बरेली येथे रेफर केले आहे.
 
या अपघातात 28 वर्षीय लक्ष्मी शुक्ला पत्नी संजीव शुक्ला, 28 वर्षीय रचना पत्नी कृष्णपाल शुक्ला, 60 वर्षीय सरला देवी पत्नी लालमन शुक्ला, दोन वर्षांची खुशी मुलगी संजीव शुक्ला, 15 वर्षीय हर्ष शुक्ला मुलगा संजीव शुक्ला, 14 वर्षीय सुशांत मुलगा श्यामसुंदर शुक्ला, 65 वर्षीय लालमन शुक्ला मुलगा नंदलाल, 40 वर्षीय श्यामसुंदर शुक्ला मुलगा लालमन शुक्ला, तीन वर्षांचा आनंद मुलगा कृष्णपाल रा.मोहल्ला तिरथ पोलिस स्टेशन गोला जिल्हा लखीमपूर खेरी, चालक डी.सी.एम. 35 वर्षीय दिलशाद मुलगा आशिक रा. गाव दानेली पोलीस स्टेशन गोला जिल्हा लखीमपूर खेरी याचा मृत्यू झाला.
 
या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती