काशीला 1500 कोटी, मोदींनी केलं योगी याचं कौतुक

गुरूवार, 15 जुलै 2021 (13:47 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 8 महिन्यांनंतर वाराणसी म्हणजेच काशी येथे पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उघडपणे कौतुक करताना मोदींनी काशीसाठी 1500 कोटींची भेट दिली आहे.
 
मोदींनी काशी येथे 14 ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन केले आणि इतरही अनेक भेट दिल्या. ते म्हणाले की कोरोनाशी लढण्यासाठी युपीकडे मजबूत पायाभूत सुविधा आहेत. काशी एक वैद्यकीय केंद्र म्हणून उदयास येत आहे, कोरोना कालावधीत येथे डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. 
 
मोदी म्हणाले की, महादेवांच्या आशीर्वादाने काशीचा विकास सतत सुरू आहे. बनारसची स्वच्छता ही आमची आकांक्षा तसेच प्राथमिकता आहे.
 
पंतप्रधान म्हणाले कोरोना संक्रमण 100 वर्षांतील सर्वात मोठी त्रासदी आहे. यूपीमध्ये दुसरी लाट थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न अभूतपूर्व आहे. ऐवढचं नव्हे तर यूपीमध्ये सर्वात अधिक लसीकरण झाले तसेच सर्वाधिक कोरोना टेस्टिंग करणारं राज्य देखील यूपी आहे. त्यांनी म्हटलं की यूपीमध्ये 550 ऑक्सीजन प्लांटचे काम सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती