लोकल ट्रेन ही मुंबईकरांची 'जीवनरेषा' आहे. दररोज लाखो प्रवासी प्रचंड गर्दीत प्रवास करतात.गुरुवारी सकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या एका प्लॅटफॉर्मवर एक दुःखद घटना घडली. चुकीच्या बाजूने लोकल ट्रेनमधून उतरताना एका 27 वर्षीय तरुणाचा मान लोखंडी कुंपणात अडकल्याने मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील स्थानकावर सकाळी ही दुर्देवी घटना घडली.
त्याच ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आणि घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो व्यक्ती विरुद्ध बाजूने, जो कुंपणाने वेढलेला भाग आहे, उतरण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्न करताना त्याची मान कुंपणात अडकली आणि तो जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.