12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

शनिवार, 22 मे 2021 (08:13 IST)
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या 12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांनाच प्रश्न केला आहे. 
 
6 नोव्हेंबर 2020 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त सदस्य पदासाठी 12 नावांची शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांकडून त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणात नाशिकच्या रतन सोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर  उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस 6 नोव्हेंबर 2020 ला केली असताना त्याबाबत अद्याप का निर्णय घेतला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती