मुंबईवर पाणीकपातीचे संकट, धरणात फक्त 11 टक्के साठा

शनिवार, 18 जून 2022 (16:07 IST)
मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.मुंबईवर पाणीकपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात फक्त 11 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. मुंबईत जुलै अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट ऐन पावसाळ्यात ओढवणार आहे. मान्सूनने दडी मारल्याने बळीराजाही चिंतेत आहे.
 
जून महिन्याच्या शेवटी मुंबई महापालिका पाण्याच्या साठ्याबाबत आढावा घेऊन याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. आता धरण क्षेत्रात एकूण जलसाठा शिल्लक 160831 दशलक्ष लिटर आहे. तर गेल्यावर्षी याच दिवशी जलसाठा 186719 दशलक्ष लीटर होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठी कमी झाल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. 
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
- अप्पर वैतरणा -
- मोडक सागर 48357
- तानसा 6088
- मध्य वैतरणा 23719
- भातसा 76788
- विहार 3715
- तुलसी 2164

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती