राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मच्छीमाराना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वी लवकर येण्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप मान्सून आलेला नाही. उद्या पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्राच्या किनारी पट्टीसह लगतच्या भागात ४० ते ५० किमी प्रतितासाच्या वेगाने वाऱ्याचा वेग ६० किमी पर्यंत जाऊ शकतो. रविवार पासून मान्सून अनेक भागात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.