मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विकी-कतरिनाने बाप्पाचं दर्शन घेतलं
शनिवार, 7 जानेवारी 2023 (07:52 IST)
सेलिब्रिटी सध्या देवदर्शनात मग्न आहेत. अनुष्का शर्मा व विराट कोहली नुकतेच वृंदावनला गेले होते. जॅकलिन फर्नांडिस वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचली होती. आता विकी कौशल व कतरिना कैफ (Katrina Kaif ) हे जोडपं सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलं. या जोडप्यानं सुद्धा देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात केली. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विकी-कतरिनाने बाप्पाचं दर्शन घेतलं. कतरिनाच्या सासूबाई वीणा कौशल यादेखील या जोडप्यासोबत होत्या.
सिद्धीविनायक मंदिरातले या तिघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
कतरिनाने यावेळी ग्रीन कलरच सलवार सूट घातला आहे. मंदिरात दर्शनावेळी तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. अतिशय भक्तीभावाने ती बाप्पाचं दर्शन घेत आहे. विकीच्या हातात प्रसाद व पूजेच्या साहित्याचं ताट आहे.