बेलापुर ते तळोजा मेट्रो-२ या मार्गिकेवर मेट्रोची चाचणी संपन्न

शनिवार, 31 डिसेंबर 2022 (20:49 IST)
नवी मुंबईमधील  मेट्रो रेल्वे स्थानकांतील बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रो-१ ची यशस्वी चाचणी फेबुवारी २०२१ घेण्यात आली. त्यानंतर उर्वरीत मार्गीकेचे काम पुर्णत्वास आल्याने ३० डिसेंबर २०२२ रोजी नवं वर्षाच्या पुर्व संध्येला बेलापुर ते तळोजा मेट्रो-२ या मार्गिकेवर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी ट्विटरवर ही माहिती प्रसिध्द केली आहे. मात्र नवी मुंबईतील सिडकोच्या पहिला वहिला मेट्रो मार्ग सुरु होण्यास आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 
या मेट्रो मार्गावर साडेतीन हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांनी सेंट्रल पार्क ते पेंधर हा टप्पा क्रमांकाचा प्रवास केला होता. तेव्हा दोन महिन्यात नवी मुंबई मेट्रो सुरु होईल असे सांगितले होते. मात्र ती अजून सुरु झालेली नाही. विशेष म्हणजे नवी मुंबई मेट्रो फेज १ बेलापूर ते पेंढारला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून ‘डायनॅमिक क्लिअरन्स सर्टिफिकेट’ प्राप्त झाले आहे.
 
सद्यस्थितीत ११ स्थानकांपैकी १ ते ६ स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे रखडले होते.कोरोनाची स्थिती मावळल्यानंतर मेट्रो-२ च्या कामाची गती घेतली आहे. मेट्रो मार्गिकेतील बेलापूर, सेंट्रल पार्क, उत्सव चौक या स्थानकांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
आता पुन्हा सहा महिन्यांची प्रतीक्ष करावी लागणार आहे. पहिल्या टप्पयातील सेंट्रल पार्क ते पेंधर या मार्गास रेल्वे बोर्डने यापुर्वीच मंजुरी दिली आहे. तसेच या प्रकल्पाचा खर्च वाढल्याने आयसीसीआय बॅकेकडून ५०० कोटीचे कर्ज घेण्यास गेल्याच महिन्यात मंजुरी दिली आहे.
 
सीबीडी बेलापुर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर सेक्टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंघर- तळोजा ही ११ स्थानके या मार्गावर आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती