इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाने स्वता:चे जीव धोक्यात घालून या चिमुकलीचा जीव वाचवला. चिमुकली 13 व्या मजल्यावर खेळत असताना रेलिंगवरून घसरून बालकनीच्या काठावर लटकली नंतर ती खाली पडली. 13 व्या मजल्यावरून मुलगी खाली पडताना पाहून भावेश ने धावत जाऊन तिला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चिमुकली त्याच्या हातून निसटली आणि थेट जमिनीवर जाऊन पडली. या अपघातात मुलीला किरकोळ दुखापत झाली.