या घोटाळ्यात, २०२३-२४ दरम्यान अवैध वाहनांवर संशयास्पद ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या. तसेच निलंबित अधिकाऱ्यांमध्ये सहाय्यक आरटीओ रावसाहेब रगडे आणि मोटार वाहन निरीक्षक उमेश देवरे यांचा समावेश आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीनंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले. १० मार्च रोजी जारी केलेल्या निलंबन आदेशानुसार, महाराष्ट्र महालेखापाल (ऑडिट) यांनी मुंबई पश्चिम आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात अनियमितता आढळून आणली होती.
तसेच बनावट ड्रायव्हिंग चाचण्यांच्या आधारे जारी केलेल्या परवान्यांबद्दल ऑडिट अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर अंतर्गत चौकशी करण्यात आली. अंधेरी आरटीओच्या नेतृत्वाखालील तपासणीत परवाना देण्याच्या प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्या.