फेरीवाला कोट्याधीश बनला

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (11:42 IST)
एक सामान्य फेरीवाला उत्तरपदेशातून मुंबईत काम शोधण्यासाठी येतो आणि काही वर्षातच तो कोट्याधीश बनतो. आज पर्यंत आपण बऱ्याचदा ऐकले आहे की एखाद्या भिकाऱ्याकडे अफाट मालमत्ता सापडली.असं काही घडलं आहे अल्पावधीतच कोट्याधीश बनलेल्या संतोष कुमार सोबत.परंतु हा कोट्याधीश प्रामाणिक पणाने काम करून नव्हे तर गुन्हेगारीच्या मार्फत काम करून बनला आहे.पण म्हणतात न की काळा पैसा किव्हा गुन्हेगारीने कमावलेला पैसा बाहेर पडतो.संतोष ला पोलिसांनी गैर व्यवहारामुळेआणि गुन्हेगारीत संबंधातून कमावलेल्या पैसांसाठी अटक केली आहे.आरोपीचं नाव संतोष कुमार उर्फ बबलू ठाकूर असं आहे.आरोपी उत्तरप्रदेशातील सुल्तानपूरचा आहे.
 
अल्पावधीतच कोट्याधीश बनलेला 43 वर्षाचा संतोष कुमार हा 2005 साली आपल्या गावाकडून मुंबईत पैसा कमविण्यासाठी आला.सुरुवातीला त्याने मोल मजुरी करून पैसा कमावला.नंतर पैशाची हाव माणसाला काहीही करण्यास भाग पाडते.असं काही संतोष सह झाले.स्थायिक झाल्यावर त्याची ओळख काही स्थानिक गुन्हेगारांशी झाली.तो स्थानिक गुंडाना दारू पाजून इतर स्थानिक फेरीवाल्यांकडून दिवसाला 500 -1000 रुपया पर्यंत पैसा वसूल करायचा.हळू हळू हफ्त्याने त्याने लाखो रुपये कमावले.
 
छत्रपती टर्मिनल्स ते कल्याण पर्यंत फेरीवाल्याच्या एका संघटित गुन्हेगारीत त्याचा जम बसला.त्याने या गुन्हेगारीने कोट्यवधी रुपये कमावले.त्याचे मुंबईतच अनेक चाळींमध्ये घर आहे.त्याने आपल्या पत्नीच्या नावावर देखील अनेक जमिनी घेतल्याला आहे. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावाने बरीच जॉईंट मालमत्ता आहे. शाळेच्या मार्फत पक्की घरे घेऊन त्यात गुंतवणूक करण्याचा धंदा संतोष चा होता.नवी मुंबईतच नव्हे तर त्याच्या मूळगावी सुलतानपूर उत्तरप्रदेशात देखील त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे.
 
पोलिसांनी त्याला एक संघटित गुन्हेगारीच्या मोठ्या रॅकेट अंतर्गत अटक केले आहे. संतोष सह पोलिसांनी त्याच्या आठ साथीदार आणि त्याच्या पत्नीला देखील अटक केले आहे. ही कामगिरी रेल्वे पोलिसांनी केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती