आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीत भीषण आग लागली . ही आग धारावीच्या खाडीच्या बाजूला आहे मिळालेल्या माहितीनुसार, आज (13 मार्च, रविवार) अकरा ते बाराच्या दरम्यान आग लागली आहे. आगीमुळे धारावी परिसरातील खाडी भागात धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. आगीच्या ज्वाला खूप उंच असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही आ अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान लागली. आग पसरू लागल्याने स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.