मुख्यमंत्र्यांनी घेतली हाफकीनची भेट

शनिवार, 20 मार्च 2021 (16:27 IST)
हाफकीन या औषध निर्माण संस्थेमार्फत लस निर्मिती करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी सरकार लागेल ती मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 
 
ते म्हणाले, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असून राज्यात लसीकरणही वाढवण्याची गरज आहे. राज्यात जवळपास २३ ते २४ कोटी लशीची गरज आहे. मात्र, तितका पुरवठा होत नाही. लसीकरणाबाबत जे केंद्र सरकारकडून वक्तव्ये केली जात आहेत ती पाहता मला वाटते की यात राजकारण करू नये आणि वेळही घालवू नये. हाफकीनकडून लसनिर्मिती करण्याबाबत चर्चा सरू आहे.

पंतप्रधानांच्या व्हीसीमध्येही मी हा मुद्दा मांडला. देशाला कोविडमुक्त करण्यात सीरम कंपनीचे मोठे काम आहे. हाफकीनमद्ये लस बनवू शकतो का? याचा आढावा आम्ही घेतला. या संस्थेला लागेल ती मदत करण्यास सरकार तयार आहे. आपल्याला या संकटातून बाहेर पडायचे आहे.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती