ठाणे न्यायालयाने बलात्काराच्या आरोपींना दिली जन्मठेपेची शिक्षा

शनिवार, 8 मार्च 2025 (18:27 IST)
ठाणे जिल्हातील न्यायालयाने 2017 मध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. 
ALSO READ: ठाणे येथे शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ४७ लाख रुपयांची फसवणूक
न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 55 हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे. आरोपींना पीडितेच्या अपहरण आणि दरोडा टाकण्यासाठी दोषी ठरवले होते.

आरोपींना वेगवेगळ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून न्यायाधीशांनी आदेशात म्हटले आहे की, सर्व शिक्षा एकाच वेळी चालणार आहे. 

तसेच पीडितेला भरपाई म्हणून 40 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. कायद्यानुसार, पीडितेला भरपाई देण्यासाठी प्रकरण डीएलएसएकडे पाठवण्यात आले आहे. 
ALSO READ: मुंबईत कार-स्कूटरच्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू;
पीडिता एका दुकानावर व्यवस्थापक म्हणून कामाला होती. 19 डिसेंबर 2017 रोजी कामावरून रात्री परत येतांना तिने एक कॅब घेतली. दुसरा आरोपी आधीच कॅबच्या पुढच्या सीटवर बसला होता.  आरोपी कॅब चालकाने काही अंतरावर जाऊन गाडी थांबवली आणि टायर पंक्चर झाल्याचे सांगितले आणि महिलेला लुटण्यास सुरु केले.
ALSO READ: ठाणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशिंना अटक केली
तिचा मोबाईल आणि दागिने लुटल्यावर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरुन पळून गेले. नंतर पोलिसांनी आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना तुरुंगवास झाला. सरकारी वकिलांनी आरोपींवरील सर्व आरोप सिद्ध केले असून न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती