ताडदेव दुर्घटना:मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत

शनिवार, 22 जानेवारी 2022 (16:39 IST)
मुंबईत ताडदेव भागातल्या कमला बिल्डिंग या 20 मजली इमारतीला सकाळी आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
 
• या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकार 5 लाख रुपयांची भरपाई देईल.
• जखमींवर उपचार करण्यास 2 रुग्णालयांनी नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र दोन्ही रुग्णालयांनी, जखमींना दाखल करून उपचार केल्याचे, मला कळवले आहे.
असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी एका आणखी ट्विटमध्ये लिहिले आहे की ताडदेव येथील कमला इमारतीस लागलेली आग दुर्दैवी असून येथे बचावकार्य वेगाने सुरू आहे. तेथील नेमकी परिस्थिती, मदतकार्य याबाबत माहिती घेण्यासाठी या ठिकाणाला भेट दिली. तसेच रहिवाशांशी बोलून त्यांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
 

ताडदेव येथील कमला इमारतीस लागलेली आग दुर्दैवी असून येथे बचावकार्य वेगाने सुरू आहे. तेथील नेमकी परिस्थिती, मदतकार्य याबाबत माहिती घेण्यासाठी या ठिकाणाला भेट दिली. तसेच रहिवाशांशी बोलून त्यांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. pic.twitter.com/ijMzzrC0sV

— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2022
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी आहेत. 15 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती