मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (21:32 IST)
मुंबईत देखील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून असून  मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 
 
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा आमचा विचार आहे.  हॉटेल ५० टक्के उपस्थितीने चालवले जाणार आहे. तसेच दुकानं आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवणार असल्याचे संकेत देखील किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती