आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर मुलाने लोखंडी रॉडने केली मारहाण, ठाण्याची घटना

सोमवार, 10 मार्च 2025 (18:07 IST)
ठाण्यातून एका तरुणाने आईला पैसे न दिल्याबद्दल मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुलाला ड्रग्ससाठी आईने पैसे न दिल्याने मुलाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली. 
ALSO READ: मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत 5 कामगारांचा मृत्यू
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या 53 वर्षीय आईला ड्रग्ससाठी पैसे देण्यास नकार दिल्याचा त्याला राग आला आणि त्याने आईला लाथा मारल्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली.
ALSO READ: ठाणे न्यायालयाने बलात्काराच्या आरोपींना दिली जन्मठेपेची शिक्षा
या मारहाणीत महिलेच्या डोळ्याला दुखापत झाली. या प्रकरणात तरुणावर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे बदलापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 115 (2) आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: मुंबईत कार-स्कूटरच्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू;

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती