काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीः राऊत

शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (14:29 IST)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झालेल्या मनसेच्या अधिवेशनातून हिंदुत्वाची भूमिका घेण्याचे संकेत दिले असून त्यावर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच देशात प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आहे. काही लोकांना आता हिंदुत्वाची पालवी फुटली आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. या देशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला.
 
हिंदुत्वाचा विचार देशाला अभिप्रेतच होता. बाकी सगळे ठीक आहे, आता काही लोकांना पालवी फुटली आहे. फुटू द्या. पण, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही. म्हणून फक्त 23 जानेवारीलाच नव्हे तर रोजच महाराष्ट्रासह देशात बाळासाहेबांचे स्मरण होत असते, असे संज राऊत यांनी सांगितले.
 
बाळासाहेब कोणत्याही पदावर नव्हते. पण, जगत्‌ज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे ते वावरले. लोकांना गोळा केले. लढण्याची प्रेरणा दिली. आजची शिवसेना त्यांच्याच मार्गावर जात आहे, असे सांगतानाच शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत प्रखरपणे पेटविली. स्वातंत्र्यवीर सावरकरानंतर 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून बाळासाहेब आहेत, असेही राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती