ठाण्यातील साकेत रोड परिसरात एक व्यक्ति अम्बरग्रीसच्या विक्रीसाठी येण्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे युनिटच्या पथकाने सोमवारी राबोडी परिसरात पाळत ठेवली आणि सापळा रचून एका 53 वर्षीय व्यक्तीला संशयावरून अटक केली. या व्यक्ति कडून पोलिसांना 5 कोटी रुपयांच्या क़ीमतीचे 5.48 किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीने हा प्रतिबंधित पदार्थ नाशिक येथून एका व्यक्तीकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. तो याची विक्री 80 लाखांमध्ये करणार असल्याची माहिती दिली.