गेल्या वर्षी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात शौचालयांच्या बांधकामात 100कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळले होते. यानंतर किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पतीची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने राऊत यांना मानहानीचा दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.