मुंबई महापालिकेत निनावी पत्रामुळे खळबळ

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (16:03 IST)
मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये प्रशासन आणि कंत्राटदारामध्ये साटंलोटं असल्याचं म्हटलंय. तसेच सॅप प्रणालीत हस्तक्षेप करत काही कर्मचारी कंत्राटदारांना मदत करत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय. हे पत्र कोणी लिहिलं ? कोणी इथपर्यंत पोहोचवलं ? त्यामागचा हेतू काय ? असे प्रश्न उपस्थित होतायत. २८ जानेवारी मुंबई महापालिकेत हे पत्र आलंय. 
 
मनपा आयटी विभाग कर्मचारी, सॅप कंपनी कर्मचारी, कंत्राटदार यांचं रॅकेट असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आलाय. निनावी पत्राद्वारे तक्रारदाराने चौकशीची मागणी केलीय. 
 
या पत्रात तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. तसेच ठराविक कंपन्यांना कशाप्रकारे कामं मिळत याची माहिती या पत्रातून देण्यात आलीय. भाजपने हे पत्र गांभीर्याने घेतलं असून भाजप गटनेते आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहून याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी कर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती