मुंबईतील शाळा या एक दिवसाआड सुरु करण्यात येणार

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:58 IST)
मुंबईतील शाळा या एक दिवसाआड सुरु करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. पुर्ण क्षमतेने विद्यार्थी शाळेत येणार असतील तर दोन सत्रांत शाळा सुरु करण्यात येणार असून एका बेंचवर एक विद्यार्थी तर एका वर्गात केवळ १५ ते २० असे आसनक्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
 
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असून मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबतची माहिती दिली आहे. पाललकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटलं आहे. पालकांनी शाळेशी आणि शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करावा, जेणेकरुन संमीत पत्र मिळेल ते भरुन शाळेत जमा करावे. तेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येईल. महानगरपालिकेच्या शाळा आरोग्य सेंटरला कनेक्ट राहतील ज्या शाळा खासगी आहेत त्यांनी महानगरपालिका आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहाव अन्यथा खासगी आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी खोकला झाल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रुग्णालयात नेले पाहिजे, आरोग्याची काळजी घेणे त्याची लक्षणे, विद्यार्थ्यांवर शाळा प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
 
सुरक्षितता आणि दक्षता घेणे गरजेचे आहे. शाळेत ५० विद्यार्थी असतील आणि सर्व विद्यार्थ्यांना घरुन परवानगी मिळाली तर त्यांना दोन सत्रात बोलवण्यात येईल एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात येईल. विद्यार्थ्याला मास्क, सॅनिटायझर देऊ परंतु विद्यार्थ्यांसोबत एक अधिक मास्क आणि सॅनिटायझर ठेवावे असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती