रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यु

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:40 IST)
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ मधील पालेगाव या ठिकाणी रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व या आपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाल्याचे माहीती समोर येत आहे.
 
अंबरनाथ एमआयडीसी रोडवर एका भरघाव वेगात असलेल्या गाडीने रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. व जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी नगर पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून. हे सर्व जण उल्हासनगर येथील असल्याचे  माहीती पोलिसांनी दिली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती