मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या अटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहे. मुंबईत सोमवारी केवळ एक हजार रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत आजपासून सुधारीत नवी नियमावली जाहीर झाली आहे. तर मुंबईतली सर्व पर्यटन स्थळही खुली होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार
स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू
रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू
धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी
लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा