या बिलांबाबतच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवा, कोर्टाचे आदेश

बुधवार, 30 जून 2021 (16:18 IST)
नागपूर जिल्ह्यातील ५८० रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा बिल उकळल्याच्या घटनेची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाच्य़ा नागपूर खंडपीठाने घेतली आहे. खंडपीठाने या बिलांबाबतच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवा असेही आदेश पालिकेला दिले आहेत. सध्या नागपुर महानगरपालिकेकडे जादा बिल उकळल्य़ासंदर्भात ५८० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र खासगी रुग्णालये तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टाळाटाळ करत सहकार्य करत नसल्याचे नागपुर मनपाने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
 
कोरोनाबाधित रुग्णांकडून उकळले जाणाऱ्या जादा बिलसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी खंडपीठासमोर शपथपत्र सादर केले. या शपथ पत्रातून, ५८० रुग्णालयांविरोधात कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यावर रुग्णालयांना बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवून संधी दिली होती. मात्र शहरातील खासगी रुग्णालये मनपाच्या नोटीसला जुमानत नसल्याचीबाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर नागूपर खंडपीठाने सुनावणीदरम्यान, तक्रारदारांना जर सात दिलवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास संबंधित रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करावी अशा कडक आदेश दिले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती