ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका कंपनीच्या रिॲक्टरचा स्फोट होऊन धातूचा तुकडा घरावर पडल्याने एका व्यक्तीला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले.तर त्याची पत्नी आणि मुलगी जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4:30 च्या सुमारास ही घटना घडली.
स्फोटानंतर धातूचा एक तुकडा 300 ते 400 मीटर उडून गावातील एका चाळीवर घरात पडला.
घरातील माणसे गाढ झोपेत असताना त्यांच्यावर छतावरून पडला. या अपघातात एका व्यक्तीच्या पायांना गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आणि त्याची पत्नी आणि मुलगी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.