मुंबईत पावसामुळे थंडी वाढली, हवामान खात्याचा अंदाज- तापमानात घट होऊ शकते

सोमवार, 24 जानेवारी 2022 (09:22 IST)
देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे, डहाणू आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण कोकण विभागात  हलक्या सरींमुळे हवामानातील गारवा वाढला आहे. या पावसानंतर मुंबईचे तापमान घसरण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 
 
पाऊस एक ते दोन मिमी असेल, असे सांगण्यात येत आहे. मुंबईतील काही भागात ढगाळ वातावरण असून तर काही भागात हलका पाऊस पडत आहे. मुंबईशिवाय सिंधुदुर्ग तसेच पुणे जिल्ह्यातीली मावळमध्ये गारठा वाढला आहे. या पावसानंतर 23 जानेवारीपासून तापमानात घट होणार आहे. मुंबईत दिवसाचे तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
 
तर ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे. सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून येत्या काही दिवसात मुंबईतील किमान तापमान 15 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती