या घटनेची माहिती देताना, DGCA ने सांगितले की, विशाखापट्टणमहून मुंबईकडे उड्डाण करणारे VSR Ventures Learjet 45 VT-DBL विमान मुंबई विमानतळावरील रनवे 27 वर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि अपघाताला बळी पडले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता 700 मीटर होती. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार विमान अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. काही वृत्तांमध्ये या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितले की, चार्टर प्लेन कसे घसरले याचा तपास सुरू आहे.