छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली

शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (15:42 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सध्या महाराष्ट्र प्रचंड तापले आहे. राजकीय खळबळ उडाली असून विरोधी पक्ष राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरले असून या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 4 डिसेंबर 2023 रोजी नौदलाच्या दिना निमित्त उभारण्यात आला असून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी पालघर येथे एका सभेत या घटनाप्रकरणी जनतेची माफी मागितली आहे. 

ते म्हणाले, जेव्हा मला पंतप्रधान म्हणून निवडले तेव्हा मी सर्वप्रथम रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी.जाऊन प्रार्थना केली होती. सिंधुदुर्ग मध्ये जे काही झालं त्यासाठी मी छत्रपती शिवाजींच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नावंच  नाही तर ते आराध्य दैवत आहे. मी आज शिवरायांच्या चरणी डोकं ठेऊन त्यांची माफी मागतो. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे वाधवन बंदराची पायाभरणी केली. या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 76,000 कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. वडवण बंदराचा आज पायाभरणी करण्यात आला. हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल. 
Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती