तसेच पोलीस अधिकारींनी सांगितले की, हवालदाराने हे पाऊल उचलण्याचे कारण शोधण्यात येत आहे. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस नियंत्रण कक्षात तैनात असलेले कॉन्स्टेबल सागर अथनेकर यांनी कथितपणे त्यांच्या घरी गळफास लावून घेतला, असे अधिकारींनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.