मिळालेल्या माहितीनुसार पालघरमधील समुद्रकिनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळून आली आहे ही बोट पाहिल्यानंतर पोलिसांनी एक ॲडव्हायझरी जारी करून कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि सर्वसामान्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी तटरक्षक दलाला शोध मोहीम राबविण्याची विनंती करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबरला मध्यरात्री डहाणू तालुक्यातील चिखले गावाजवळ स्थानिक लोकांनी एक संशयास्पद बोट पाहिली आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ही बोट समुद्रकिनाऱ्याजवळ होती, परिसरातील बोटीपेक्षा मोठी आणि रुंद दिसत होती. पण स्थानिक लोकांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट आणि दुचाकींचे हेडलाईट वापरून पाहण्याचा प्रयत्न केला असता, बोट अरबी समुद्रात निघून गेली. तसेच संशयास्पद हिरवी आणि पांढरी बोट शोधण्यासाठी तटरक्षक दलाने हेलिकॉप्टर तैनात केले आहे.