महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले. तसेच ते म्हणाले की, माझ्या मुलाला टार्गेट करू नका.जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर या आणि माझ्याशी स्पर्धा करा, असे सीएम म्हणले.
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे यांनी केलेल्या काही टिप्पण्यांचा संदर्भ शिंदे यांनी दिला.
तसेच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “तुम्ही कोणाच्या मुलावर टीका का करताय? स्पर्धा करायची असेल तर या आणि त्याच्या वडिलांशी स्पर्धा करा. तसेच पुढे सीएम शिंदे म्हणाले की, आमच्या कामाला मिळालेल्या प्रतिसादामुळे उद्धव ठाकरे आतून तुटले आहे आणि त्यामुळेच ते अशा कमेंट करत आहे, असे टीकास्त्र शिंदेंनी ठाकरेंवर सोडले. तसेच शिंदे म्हणाले की, आपल्यावरील आरोपांना आम्ही आपल्या कामाने उत्तर देऊ.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
गेल्या शनिवारी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना खुले आव्हान दिले होते आणि त्यांना सोडून गेलेले नेते पक्षात परतणार नाहीत, असे सांगितले होते. तसेच कोणत्याही गद्दाराला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. व विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देईल, असे देखील ठाकरे म्हणाले. दीड महिन्यात हे गद्दार आमच्याकडे नोकरीसाठी येतील कारण ते बेरोजगार होतील. निवडणुकीनंतर मी कोणत्याही गद्दाराला नोकरी देणार नाही.