अभिनेता सुशांत सिह राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली. पण एम्सच्या अहवालानंतर त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा निष्कर्ष निघाला नाही.