'पॅंटची चेन उघडणं, लहान मुलीचा हात पकडणं हा लैंगिक अत्याचार नाही'
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (23:19 IST)
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं लहान मुलीचा हात पकडणं किंवा पॅंटची चेन उघडणं ही गोष्ट लैंगिक शोषणाअंतर्गत येत नाही, असं म्हटलं आहे.
लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) अंतर्गत लहान मुलीचा हात पकडणं किंवा पॅंटची चेन उघडणं या गोष्टींना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
पण, या दोन्ही गोष्टी भारतीय दंड विधान (IPC) कलम 354 अ (1) (i) अंतर्गत लैंगिक शोषण म्हणून ग्राह्य धरल्या जाऊ शकतात असंही स्पष्ट केलं आहे.
न्यायालयाच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी एका 50 वर्षीय व्यक्तीनं 5 वर्षीय मुलीवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये हा निकाल दिला आहे.