मुंबईसाठी बुधवार ठरला सर्वात थंड दिवस

गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:36 IST)
मुंबई शहरात बुधवारी हा चालू वर्षातील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस ठरला. बुधवारी किमान तापमान 15.3 डिग्री सेल्सियस इतके नोंदवलं गेले आहे. यंदाच्या हिवाळ्यात यापूर्वी सर्वात किमान 15 डिग्री इतके तापमान गेल्या 29 डिसेंबर रोजी नोंदलं गेले. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये सर्वात कमी तापमान 11.4 डिग्री सेल्सियस इतके नोंदले गेले होते.
 
नैऋत्येकडून येत असलेल्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईत पुढील काही दिवस थंडगार वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 10 ते 12 डिग्री सेल्सियस इतके तापमान राहील, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती