नारायण राणे यांना पुन्हा एकदा जुहू बंगल्याबाबत नोटीस

मंगळवार, 15 मार्च 2022 (07:23 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा जुहू बंगल्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वत:हून तोडा, अन्यथा महापालिका तोडक कारवाई करणार असल्याचं नोटीस मध्ये म्हटलं आहे. राणेंच्या जुहूतील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करत ३५१(१)ची नोटीस बजावण्यात आली आहे. 
 
नारायण राणे यांच्या बंगल्यात केलेले बदल हे मंजूर केलेल्या प्लॅननुसार असल्याचे सिद्ध करण्यास आधीच्या नोटीसमध्ये सांगितले होते. यानुसार राणे यांनी सर्व कागदपत्रे पालिकेला दाखवली. परंतु पालिकेचे समाधान न झाल्याने दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.
 
२१ फेब्रूवारी पालिकेच्या के पश्चिम विभागाने बंगल्यात जावून महापालिका अधिकाऱ्यांनी बंगल्याची तपासणी केली होती. सर्वच मजल्यांवर चेंज ऑफ यूझ झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी रूम बांधल्याचा नोटीसीत उल्लेख आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती