नवी मुंबईत म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली आयोजकाने केली 63 लाख रुपयांची फसवणूक

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (13:43 IST)
नवी मुंबईत एका व्यक्तीची आयोजकाने म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करून नफा मिळवण्याचा नावाखाली 63 लाखांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका म्युझिक फेस्टिवलच्या आयोजकाने पीडित व्यक्तीला मुंबईतील बीकेसी परिसरात आयोजित केल्या जाणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टचे म्हटले. हा कॉन्सर्ट गेल्या वर्षी 21 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान होणार होता. या कार्यक्रमासाठी आयोजकाने पीडित व्यक्ती कडून 63.50 लाख रुपये घेतले होते. 35 टक्के नफा मिळेल असे सांगून त्याने रकम घेतली आणि फसवणूक केली. 

फसवणूक झाल्याचे लक्षात येता पीडितने नेरूळच्या पोलीस ठाण्यात आयोजकाच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आयोजकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती