बाप्परे, मुंबई पोलिसांच्या व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ

गुरूवार, 12 जानेवारी 2023 (22:01 IST)
मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अश्लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर  शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. या कृतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच सर्वांनाच धक्का बसला.
 
मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी हा नो पॉलिटिकल मॅसेज या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा सदस्य होता. या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे या ग्रुपमध्ये अनेक पोलीस कर्मचारी सहभागी आहेत. 9 डिसेंबर रोजी या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचा एक अश्लील व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर केला होता. हा व्हिडीओ इतरांसह ग्रुपमध्ये असलेल्या इतर पोलिसांनी पाहिला होता. मात्र या व्हिडीओमध्ये असणारी महिला ही त्याच ग्रुपमध्ये असणाऱ्या एका दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी होती. व्हिडीओ पाहिल्यानंतर इतर सदस्यांनाही धक्का बसला.
 
व्हिडीओमध्ये जी महिला होती त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीकडे याबाबत चौकशी केली. तसेच पत्नीला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या व्हिडीओवरुन सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करण्यास सांगितले. मात्र पत्नीने असे करण्यास नकार दिला. त्यनंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने 9 डिसेंबर रोजी व्हिडीओ पाठवणारा पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी आणि पॉलिटिकल मेसेज नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्या ग्रुपमध्ये 126 पोलीस कर्मचारी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती