लखनौ- उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून अनेकांचा विश्वास बसत नाहीये. एक पक्षी कानपूरच्या बेनाझबार भागात सापडला आहे. ज्याला लोक रामायण काळाशी जोडत आहेत. हा पक्षी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बेनाझबार इदगाह स्मशानभूमीजवळ दुर्मिळ हिमालयीन ग्रिफॉन गिधाड रेस्क्यू करण्यात आला. हा पक्षी पाहिल्यास जटायूसारखा दिसतो. या पक्ष्याला अॅलन फॉरेस्ट प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात 15 दिवसांच्या क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले आहे.
15 दिवसांसाठी क्वारंटाइन पाठवले
जिल्हा वन अधिकारी यांच्याप्रमाणे गिधाडाला प्राणीसंग्रहालयात 15 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिमालयीन गिधाडांची जोडी दिसल्याचे समोर आले आहे. बेनझार परिसरात आणखी एक गिधाड आहे, त्याचा शोध सुरू आहे.
प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यांनी सांगितले की, पकडण्यात आलेले हिमालयीन गिधाड रुग्णालयाच्या आवारात इतर पक्ष्यांपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याचे वजन सुमारे 8 किलो आहे. डॉक्टरांचे पथक दुर्मिळ गिधाडावर लक्ष ठेवून आहे. प्राणीसंग्रहालयात आधीच चार हिमालयीन ग्रिफॉन गिधाडे आहेत.
बेनाझबार इदगाह स्मशानभूमीत काही लोकांनी पाहिले, हे गिधाड उडू शकत नव्हते. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. ग्रिफॉन गिधाड हिमालय आणि आसपासच्या तिबेट पठारावर आढळते. ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत संरक्षित आहे.