3 वेगवेगळ्या गुन्ह्यात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार ते पाच जणांना बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश

सोमवार, 18 एप्रिल 2022 (21:32 IST)
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त बिपीन कुमार (CP Bipin Kumar) यांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल माहिती दिली. नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चांगली कामगिरी केलेल्या तीन प्रकरणांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.
 
मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायकसिंह भोसले आणि त्यांच्या टीमने पहिला आणि मोठा गुन्हा उघड केला आहे. त्यांनी आगळावेगळा अमली पदार्थ (Drugs Peddler) जप्त करत 2 नायजेरियन तरुणांना अटक केली आहे. 258 ग्रॅम वजनाचा 'मैक्लोन' अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल असा एकूण 26 लाख ,04,500/ रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली आहे.
 
 तसंच 82 लाख 50 हजार रुपयांची वीज चोरी 24 तासांचं प्रकरण एनआरआय सागरी पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या टिमने चांगली मेहनत घेतली. विपिन कुमार सिंग, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या नशामुक्ती अभियानाच्या अनुशंगाने डॉ. श्री जय जाधव यांच्यासह पोलीस आयुक्त, महेश पर्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), सुरेश मेगडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा), मा.श्री. विनायक वस्तु, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली 3 गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती