बॉम्ब स्फोटची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी धारावीतून पकडले
सोमवार, 20 जानेवारी 2025 (21:07 IST)
बॉम्ब स्फोटची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धमकी शुक्रवारी देण्यात आली होती. या मध्ये धारावी भागात बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले होते. धमकी देणाऱ्याला धारावीतून अटक केली आहे. त्याने या पूर्वी देखील अशा धमक्या दिल्या होत्या.
हे प्रकरण 17 जानेवारी रोजी घडले आहे. दुपारी धारावी पोलिसांच्या डे शिफ्टच्या अधिकाऱ्याला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. की, धारावीच्या राजीव गाँधी नगर मध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहे.
त्या नंतर तांत्रिक पथकाच्या मदतीने त्याचा शोध सुरु झाला आणि धमकी देणारी व्यक्ति धारावीतून पकडली. नरेंद्र गणपत कवळे असे त्याचे नाव असून त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्यांनी दिलेल्या धमकीच्या आधारे गुन्हा दखल करण्यात आला असून त्याने या पूर्वी देखील अशाच धमक्या दिल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.