पोलिसांचे पथक वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानाभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे. असे असतानाही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक का करू शकली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी 35 पथके तयार केली असून संशयित आरोपीं अद्याप मोकाट आहे.
सैफच्या घरातील मोलकरणीने पोलिसांना सांगितले की, घटनेदरम्यान हल्लेखोराने तिच्यावर हेक्सा ब्लेडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाने त्याला एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. निवेदनानुसार, जेव्हा तिने घुसखोराला काय हवे आहे असे विचारले तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले, “मला एक कोटी हवे आहेत.”