मुंबईत दुचाकीच्या मागे बसणाऱ्याला आता हेल्मेट सक्ती,या नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.मोटारसायकलस्वार आणि त्यांच्या स्वारांनी हेल्मेट घालावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.अन्यथा अशा मोटारसायकलस्वारांवर आणि त्यावरून येणाऱ्या लोकांवर 15 दिवसांनी कारवाई केली जाईल.हेल्मेट न वापरल्यास 500 रुपयांचं दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद या नवीन नियमांतर्गत करण्यात आली आहे. या नवीन नियमांबाबत वाहतूक पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. त्या मुळे आता बाईकवर मागे बसणाऱ्याला ही हेल्मेट वापरावे लागणार आहे.