मराठीत बोलण्यास दिला नकार, लेखिका शोभा देशपांडे यांचे दुकानासमोर ठिय्या आंदोलन

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (18:21 IST)
कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना दुकानातून ढकलून दिले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी मराठीच्या अस्मितेसाठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन केले. रात्रभर दुकानासमोर आंदोलनाला एकट्या बसून होत्या. त्यानंतर त्यांच्या मदतीला शुक्रवारी सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे कार्यकर्त्यांसह धावून आले. अखेर या मुजोर ज्वेअर्सने मनसेच्या दणक्यानंतर लेखिका शोभा देशपांडे यांची पाय पकडून मराठीत बोलून माफी मागितली आहे. 
 
माध्यमांशी बोलताना ज्वेअर्सचा मालक म्हणाला की, मला मराठी थोडे येते. मुंबईतच माझा जन्म झाला आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. मला माफ करा, असं म्हणतं त्यांने शोभा देशापांडे यांची पाय पकडून माफी मागितली आहे. २० तासांपासून शोभा देशपांडे एक पाण्याची बॉटल आणि चार मराठीची पुस्तके घेऊन आंदोलन करत होत्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती